Full-time job vs blogging? Which is best?
तुम्ही youtube वर किंवा instagram वर बऱ्याच विडियो पाहिल्या असतील ज्यात लोकं सांगतात की त्यांनी आत्तापर्यंत ब्लॉगिंग मधून किती पैसे कमावले? आणि त्यांच्या किती वेबसाइट आहेत, इत्यादि. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते जॉब पेक्षा जास्त पैसे ब्लॉगिंग मधून कमवू शकतात. आणि बरेच लोकं ब्लॉगिंग साठी जॉब सोडतात, आणि काही लोकं जॉब सोबत ब्लॉगिंग करतात. पण मग प्रश्न असा आहे की हे सगळं योग्य आहे का? अनेक प्रश्न मनात येतात की नक्की काय बरोबर आहे आणि की चूक? जॉब मध्ये जास्त पैसा आहे की ब्लॉगिंग मध्ये? जॉब सोडून ब्लॉगिंग करावी? की जॉब सोबत ब्लॉगिंग करावी? एक full time job चांगला की blogging?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्याआधी आपल्याला दोन्ही गोष्टींची तुलना करणे गरजेचे आहे. कारण की प्रत्येक माणूस हा जॉब साठी बनलेला नसतो, आणि प्रत्येक माणूस हा ब्लॉगिंग साठी बनलेला नसतो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण आपल्याला या दोन्ही गोष्टींबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. हा आर्टिकल खास त्या लोकांसाठी आहे जे ब्लॉगिंगची सुरुवात करणार आहेत, जे जॉब करत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत. तर हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.
What is a full-time job and blogging?
1) Full time job:- जॉब मध्ये तुम्ही एक विशिष्ट कंपनी सोबत, किंवा ब्रॅंड सोबत काम करता. एक तर ते work from office असेल किंवा work from home असेल. Full time job हा साधारणपणे 9 तासांचा असतो ज्यातला 1 तास हा तुमच्या lunch आणि tea break साठी असतो. जॉब ची वेळ ही नक्की असते आणि आठवड्यातून एकदा तुम्हाला सुट्टी भेटते. काही वेळा सण असल्यावर पंगरी किंवा बिन पगारी सुट्टी मिळते. तुमचा पगार हा तुमच्या अनुभव आणि कौशल्यावर अवलंबून असतो, तसेच तुमचे प्रमोशन ही अशाच काही गोष्टींवर अवलंबून असते.
2) Blogging:- Blogging मध्ये तुम्हाला तुमची एक वेबसाइट बनवावी लागते. तुम्ही त्या वेबसाइट वर विविध प्रकारचे आर्टिकल पोस्ट करू शकता. काही काळानंतर तुम्ही तुमच्या वेबसाइटला म्हणजेच ब्लॉगला monetize करू शकता. यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, जो की निश्चित नाही. तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये पैसे कमवण्यासाठी सुरुवातीला भरपूर वेळ द्यावा लागतो, पण कालांतराने तुम्ही जास्त काम नाही केलं तरीही तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता. इथे प्रश्न patience चा आहे. परंतु हा एक प्रकारचा व्यवसाय आहे, त्यामुळे किती काम करायचं आणि किती वेळ काम करायचं हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे.
आपण हे तर जाणून घेतलं की ब्लॉगिंग मध्ये आणि full time job मध्ये काय फरक आहे. आता आपण यावरूनच या दोन्हीचे काय फायदे आहेत, तसेच तुम्हाला यात कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याबद्दल जाणून घेऊयात.
Advantages of a full-time job:-
1) Stable and consistent income:- जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनी सोबत काम करते, जॉब करता, तेव्हा तुमची कामाची वेळ ही fix असते. कामाच्या वेळेससोबतच तुमचा पगार किती येणार हे ही fix राहतं. तुम्ही कसं काम करता यावरही तुमचा पगार तसेच तुमचं promotion ही अवलंबून असतं. काही प्रमाणात तुमची पगारवाढ तुमच्या हातात असते. परंतु तुम्हाला दर महिन्याला पगार येणार हे मात्र नक्की असतं. पगाराची शाश्वती हा जॉब करण्याचा एक फायदा आहे.
2) Benefits ( Healthcare, retirment plans) :- बऱ्याच companies अशा असतात ज्या त्यांच्या कामगारांना पगारा व्यतिरिक्त अनेक सोई सुविधा पुरवतात. जसे की SI आणि Mediclaim. यामध्ये medical emergency साठी तुमच्या पगारामधून काही पैसे कापले जातात, आणि वेळ आलीच तर त्याचा तुम्हाला फायदा ही होतो. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही सेवा निवृत्त होता तेव्हा तुम्हाला महिन्याला काही प्रमाणात पैसे भेटतात ज्याला आपण pension असे म्हणतो. ती किती मिळते हे प्रत्येक company वर अवलंबून असतं. जॉब करण्याचा हा ही एक फायदा असतो.
3) Defined career path:- बऱ्याच लोकांना केवळ कामाचा अनुभव हवा असतो म्हणून ते जॉब करतात. कारण यामुळे त्यांना नक्की कोणत्या कामात रस आहे, त्यांना काय करायचं ही तर नक्की होतंच. परंतु यासोबतच, ते जेवढा वेळ काम करतात त्याचा त्यांना पगार ही मिळतो. तुम्हाला कशात career करायचं आहे हे ठरवायला जॉब तुम्हाला मदत करते.
हे सर्व आहेत जॉब करण्याचे फायदे, तसे जॉबचे अनेक फायदे आहेत. परंतु सध्या एवढे फायदे समजून घेणे पुरेसे आहे. आता आपण जाणून घेऊ जॉब करण्याचे नुकसान. परंतु याला नुकसान न म्हणता आपण याला जॉब करतानाची आव्हाने आहेत. ती आव्हाने आपण आता पाहुयात.
Challenges in Full-time job:-
1) Limited flexibility:- आपण एखादा जॉब करतो तर तो आपण जास्तीत जास्त काळापर्यंत करायचा विचार करतो. जॉबची वेळ की किमान 8 ते 9 तासाची असते. काही कंपनी मध्ये वेगवेगळ्या shift असतात, परंतु बऱ्याच कंपनी मध्ये एकच fix वेळ असते आणि तुमच्या जॉबचं ठिकाण हे एकच असतं. नवीन जॉब लागल्यावर नावीन्य वाटतं परंतु कालांतराने आपल्याला त्याच त्याच ठिकाणी, त्याच त्याच वेळी काम केल्याने नावीन्य तर संपतच. तसेच तुम्हाला स्वतःला वेळ न देता आल्याने तुम्हाला इतर गोष्टी करण्यासाठी जमत नाही. म्हणून जॉब मध्ये तुम्हाला limited flexibility पाहायला मिळते.
2) Work-life balance:- आपण जॉब हा जितका स्वतःसाठी करतो, तेवढंच आपण आपल्या कुटुंबासाठी ही करतो. आपल्या जवळच्या माणसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जॉब करतो. परंतु वेळेचे असंतुलन, प्रवासात गेलेला वेळ, कामाचा ताण यामुळे तुम्हाला तुमची personal आणि professional life वेगळी ठेवता येत नाही. यामुळे तुम्हाला work-life balance करायला त्रास येतो.
3) Corporate politics:- जॉब म्हणलं तर पगारवाढ आलीच. यासाठी तुम्हाला promotion मिळणं ही गरजेचं आहे. परंतु आत्ताच्या काळात प्रत्येकालाच promotion हवं असल्याने सगळेच एकमेकांचे पाय खेचत असतात. जॉब करताना प्रत्येकालाच या Corporate politics ला सामोरे जावे लागते.
हे तर झाले full-time job चे फायदे आणि काही आव्हाने. आता आपल्याला ब्लॉगिंगचे फायदे आणि आव्हाने बघायचे आहेत. आर्टिकलच्या शेवटी आपण याचा सारांश बघूयात.
Advantages of blogging:-
1) Flexibility:- Blogging बऱ्याच जणांना करायला आवडते, कारण जारी यातून आपण खूप सारा पैसा कमवू शकलो तरी ही आपण ब्लॉगिंग कुठून ही आणि कधीही करू शकतो. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर काहीही यासाठी वापरू शकता, आणि याला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वेळी हे काम करू शकता.
2) Creative freedom:- Blogging मध्ये तुम्ही एका वेळी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. अर्थात तुम्हाला त्यासाठी विविध skills शिकाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही तुमचा ब्लॉग आणखीन आकर्षक कसा बनवता येईल, याचा निर्णय स्वतः घेऊ शकता. यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त ट्रॅफिक आणून तुमची कमाई ही वाढवू शकता. त्यामुळे तुम्हाला creativity करण्याचं स्वातंत्र्य असतं.
3) Income potential:- जॉब मध्ये आपण एक फिक्स सॅलरी आणि काहीवेळा incentive ही कमवू शकता. परंतु ब्लॉगिंग ही एक अशी गोष्ट आहे ज्यातून तुम्ही हवी तेवढी कमाई करू शकता. ब्लॉग वरुण कमाई करण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, म्हणून तुम्ही तुमची कमाई कोणत्याही मर्यादे पर्यन्त वाढवू शकता, कमवू शकता.
हे आहेत ब्लॉगिंगचे तीन मुख्य फायदे, ब्लॉगिंगमध्ये नुकसान तर काहीच नाही, परंतु ब्लॉगिंग करताना तुम्हाला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागते, आणि ती आव्हाने आहेत पुढीलप्रमाणे:-
Challenges in blogging:-
1) Inconsistent income:- ब्लॉगिंग मध्ये सुरुवातीला तुम्ही कमाई करू शकाल की नाही याची शाश्वती देता येत नाही. तसेच प्रत्येक महिन्याला नक्की किती कमाई कराल याबद्दल ही काही सांगता येत नाही. कधी कमाई जास्त होते तर कधी कमी. यामुळे ब्लॉगिंग करताना सुरुवाती पासूनच कमाई होईल अशी आशा न बाळगता सातत्याने काम करावे.
2) Self-discipline:- जसे आपण पाहिले की तुम्ही ब्लॉगिंग कधीही आणि कुठून ही करू शकता. परंतु याचा अर्थ असं नाही की तुम्ही महिन्यातून एकदा काम केलं आणि वर्षभर कमाई कराल. अर्थात अशी वेळ ही येणार जेव्हा तुम्ही कमी काम केलं तरीही जास्त कमाई कराल परंतु त्याला वेळ दिल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे तुमहाल रोज थोडा थोडा वेळ काम करून स्वतःला शिस्त लावावीच लागेल, आणि जो स्वतःला शिस्त लावणार नाही तो कमाई ही करू शकणार नाही.
3) Initial investment:- कमाई नक्की कधी पासून सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला domain, hosting, इत्यादि गोष्टीत पैसे गुंतवावे लागतात. अर्थात ही एक रिस्क आहे, जी तुम्हाला जोवर तुमची कमाई होत नाही तोवर तुम्ही पैसे गुंतवू शकता.
सारांश:-
आता प्रश्न असा येतो की ब्लॉगिंग चांगली की जॉब? काय करावे ? तर उत्तर आहे की दोन्हीही. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्याही करू शकता. जॉब करून तुम्ही रोजचा अर्धा किंवा एक तास जरी ब्लॉगिंगला दिला तरीही तुम्ही काही काळाने चांगले पैसे कमवू शकता. जॉब सोबत तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुम्ही त्याला part time काम करू शकता. तुम्ही जरी जॉब करत नसाल तर तुम्ही ब्लॉगिंग full time करू शकता. त्यामुळे यातली कुठली ही एक गोष्ट तुम्ही कायम करू शकता, किंवा दोन्ही गोष्टी ही एकत्र करू शकता. एकूण एक की ब्लॉगिंग आणि जॉब दोन्ही ही तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि इच्छे नुसार करू शकता.
आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. धन्यवाद.